LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*सीमाप्रश्नी पुणे समितीच्या शिष्टमंडळाने घेतली आम.शशिकांत शिंदे यांची भेट*

*सीमाप्रश्नी पुणे समितीच्या शिष्टमंडळाने घेतली आम.शशिकांत शिंदे यांची भेट*

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चाललेल्या लढ्यात खानापूर बेळगाव येथून पुणे येथे स्थायिक झालेल्या युवक व नागरिकांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भात शनिवार दिनांक ०४ जुलै रोजी पुणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात गणपती पाटील,विश्वनाथ पाखरे ,वैराळ सुळकर, मारुती पाटील उपस्थित होते. ही भेट घडवून आणण्यासाठी जावळी कृषी उत्पन्न समितीचे उपाध्यक्ष श्री.हेमंत हिंदुराव शिंदे यांचे सहकार्य लाभले.

या भेटी प्रसंगी विश्वनाथ पाखरे यांनी सीमाभागात होणारी मराठी भाषेची गळचेपी,मराठी भाषिकांवर होणारे भाषिक अत्याचार,दाखल होणारे खोटे गुन्हे,कन्नडसक्ती व प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्ना संदर्भात माहिती दिली.

यावेळी शिष्टमंडळाला आश्वासन देताना आमदार शशिकांत शिंदे यांनी हा प्रश्न गेली ७० वर्षे प्रलंबित असून सीमाप्रश्न हा सिमावासीयांच्या अस्मितेचा आहे, मुळात हा प्रश्न महाराष्ट्राचा असून आज पर्यंतच्या राज्यकर्त्यांनी तो गांभीर्याने न घेतल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी महाराष्ट्रातच याचा मोठा उठाव झाला पाहिजे व महाराष्ट्रासह केंद्रसरकारवरही दबाव वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण पुणेस्थित सीमावासीय जो लढा या प्रश्नांसंदर्भात उभाराल त्याला आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करून निकराची लढाई लढण्यासाठी पक्षभेद विसरून या लढ्याला विशाल स्वरूप देऊया व सीमाप्रश्न सोडवून घेऊया असे आश्वासन दिले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*