Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*डिझेलचे स्मगलिंग रॅकेट उघडकीस, माळ मारुती पोलीसांची कारवाई*

बेळगांव:आखाती देशातून भारतात सोन्या प्रमाणे पेट्रोल, डिझेलचे स्मगलिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश बेळगाव पोलिसांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा कोट्यावधीचा कर चुकवून मुंबईहून बंगलोर आणि अन्य ठिकाणी टँकर मधून पेट्रोल, डिझेलची अर्ध्या किंमतीला विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

बेळगाव मधील माळमारुती पोलीसांनी डिझेलची वाहतूक करणारा एक टँकर अडवून तपासणी केली असता ट्रक चालकाकडे संबंधित कोणतीही कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले. टँकर चालकाची पोलीस स्थानकात कसून चौकशी केल्यावर पेट्रोल, डिझेलच्या स्मगलिंगचे रॅकेट उघडकीस आले. टँकरची नोंदणी गुजरातची असून त्याचा मालक कर्नाटकातील गुजरातचा आहे. पोलिसांनी टँकर मालकाला ताब्यात घेतले आहे.

टँकर मधून सतरा हजार लिटर डिझेल मुंबईहून बंगलोरला नेण्यात येत होते.या रॅकेट मध्ये राजस्थान आणि मुंबईतील व्यक्ती सहभागी आहेत.माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
आखाती देशातून जहाजातून पेट्रोल, डिझेल मुंबईला आणले जात होते आणि तेथून त्याचा पुरवठा टँकरद्वारे विविध राज्यातील पेट्रोल पंपाना केला जात होता अशी माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. खासगी जहाजातून मुंबईला पेट्रोल, डिझेल आणून नंतर टँकरद्वारे त्याचा टँकरद्वारे पुरवठा केला जात होता. या रॅकेटमध्ये तेल उत्पादक, जहाज मालक देखील सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या रॅकेटची पाळेमुळे खणण्याचा nischay निश्चय पोलिसांनी केला आहे. बेळगाव पोलिसांची दोन पथके मुंबई आणि राजस्थान येथे तपासासाठी जाणार आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*