LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पारायण सोहळ्याची उत्साहपूर्ण सांगता

बेळगाव तालुका | प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बि.के. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कंग्राळी बि.के. येथे आयोजित करण्यात आलेल्या पारायण सोहळ्याची अलीकडेच भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता.

हा आध्यात्मिक सोहळा ब्रह्मचैतन्य सद्गुरु तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर यांच्या आशीर्वादाने पार पडला. पारायणाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन, प्रवचन आणि हरिपाठाद्वारे भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले.

कर्नाटक आणि महाराष्ट्रासह पंढरपूर, कोल्हापूर, सांगली व बेळगाव परिसरातून कीर्तनकार आणि प्रवचनकार सहभागी झाले होते. हरिभक्त परायण (ह.भ.प.) राजू कावळे यांनी प्रभावी काला कीर्तन सादर केले, तर ह.भ.प. गोपाळ महादेव पाटील गुरुजी यांनीही भक्तिमय कीर्तनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारायण मंडळ, वारकरी मंडळ तसेच महिला भक्तवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. होनगा, बेकनहळ्ळी, कुडची, ज्योतीनगर, खासबाग, सानगाव आदी परिसरातील वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले. संपूर्ण सोहळा खेळीमेळीच्या आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*