Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त बेळगावात वनरक्षकांना आदरांजली*

बेळगांव:राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त बेळगावातील अरण्य खात्यातर्फे हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय वन हुतात्मा दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश टी. एन. इनवळी उपस्थित होते. प्रारंभी हुतात्मा स्मारकाला प्रमुख पाहुण्यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. जंगली प्राण्यांचे आणि जंगलाचे संरक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांची नावे वाचण्यात आली. राष्ट्रीय वन हौतात्म्य दिनाचे दरवर्षी अकरा सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात येते.

वन्य प्राण्यांचे आणि जंगलाचे संरक्षण करणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे उदगार प्रमुख पाहुणे जिल्हा सत्र न्यायाधीश टी. एन. इनवळी यांनी काढले.मुख्य अरण्याधिकारी मंजुनाथ चव्हाण, आय जी पी चेतनसिंह राठोड, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनीही हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून हौतात्म्य पत्करलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली.

https://youtube.com/shorts/gFTYaoiaEcc?si=SkCAnkZIAZSXHEKO

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*