LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*हळदी-कुंकूच्या निमित्ताने महिला शक्तीचा गौरव............!*

*हळदी-कुंकूच्या निमित्ताने महिला शक्तीचा गौरव............!*

*मण्णूरमध्ये उद्या सौभाग्य व सन्मान सोहळा.....!*

*मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर व श्री आर. एम. चौगुले,* मण्णूर यांच्या सौजन्याने *उद्या रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता*......... *अनन्या फार्महाऊस, मण्णूर* येथे पारंपरिक *हळदी-कुंकू समारंभाचे* आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सौभाग्य, स्नेह आणि सामाजिक ऐक्याला समर्पित असलेला हा कार्यक्रम मण्णूरच्या सांस्कृतिक जीवनात एक आनंददायी पर्व ठरणार आहे.

या सौभाग्यपूर्ण समारंभात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा *विशेष सत्कार* करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे *पर्यावरणवादी डॉ. शिवाजीदादा कागणीकर*, न्याय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या **धारवाड उच्च न्यायालयातील अ‍ॅडव्होकेट तृप्ती सडेकर**, तसेच राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये सुळगा गावचे नाव उज्ज्वल करणारी **बीसीसीआय अंडर-१५ क्रिकेटपटू श्रेया पोटे सुळगा* व प्रतिक्षा जोतिबा चौगुले मण्णूर ब्लॅक बेल्ट कराटे यांचा यावेळी गौरव होणार आहे.

याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या, महिलांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या *महिला शक्तीच्या प्रतीक सौ. पुनम अमोल पाटील* यांचा देखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर यांच्या कला क्रीडा व सांस्कृतिक विभागात तर्फे हा सन्मान केला जाणार आहे..

शिवाय

श्री आर. एम. चौगुले हे संस्थात्मक स्तरावर समाजातील सौहार्द, परंपरा आणि महिलांचा मान जपण्याचे कार्य सातत्याने करत असून, या हळदी-कुंकू समारंभातून परंपरेला सामाजिक जाणीवेची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमधील एकोपा, आत्मीयता आणि सन्मानाची भावना अधिक दृढ व्हावी, हा आयोजकांचा उद्देश आहे. *मण्णूर व परिसरातील सर्व महिलांनी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सौभाग्यपूर्ण आणि प्रेरणादायी समारंभाची शोभा वाढवावी*, असे भावनिक आवाहन *मातोश्री सौहार्द संघ नियमित मण्णूर या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री आर. एम. चौगुले* यांनी केले आहे.

हळदी-कुंकूच्या निमित्ताने सन्मान, संस्कार आणि सौहार्दाचा हा उत्सव प्रत्येक महिलेसाठी अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*