Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बदली झालेल्या न्यायाधीशांना बेळगावमध्ये गौरवपूर्ण निरोप समारंभ*

बेळगाव बार असोसिएशन  यांच्या वतीने बेळगाव जिल्हा न्यायालयात बदली झालेल्या सहा मान्यवर न्यायाधीशांच्या सन्मानार्थ भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात न्यायाधीशांच्या कार्यकाळातील न्यायदानाची पद्धत, शिस्तबद्ध प्रशासन आणि सर्वसामान्यांना दिलेला न्याय यांचा विशेष गौरव करण्यात आला.

समारंभात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती पुष्पलता सी.एम., जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री संदीप पाटील, वरिष्ठ सिव्हिल न्यायाधीश श्री श्रीकांत एन.ए., श्री राचोटी महागुंडप्प शिरूर, श्री शंकरप्प मालशेट्टी तसेच जेएमएफसी न्यायाधीश श्रीमती तेजश्री आर. यांचा वकिल संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून सन्मानपूर्वक निरोप दिला.

कार्यक्रमादरम्यान अनेक वरिष्ठ वकिलांनी मनोगत व्यक्त करत न्यायाधीशांनी बेलगावमध्ये दिलेल्या सेवांचे कौतुक केले. त्यांच्या कार्यकाळात न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

वकिल संघाचे प्रधान कार्यदर्शी वै. के. दिवटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला न्यायालयीन अधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ वकील तसेच संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*