Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*गोकुळ दूध संघ प्रकरण तापले; ईडी चौकशीची मागणी*

कोल्हापूर : जिल्ह्यातील गोकुळ दूध संघात कथित गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आमदार पाटील यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, एका प्रभावशाली मंत्र्यांच्या पाठबळामुळे गोकुळ दूध संघात अनियमितता घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासोबतच, संघाच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने प्रशासक नेमण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, तत्कालीन विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी सुमारे 3700 नवीन दूध संस्थांच्या नोंदणीला मंजुरी दिल्याचा मुद्दाही आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे. या मंजुरीसह इतर व्यवहारांचीही चौकशी ईडीमार्फत व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

या घडामोडींमुळे गोकुळ दूध संघाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*