Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*UPSC-KAS तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 31 मे रोजी स्कॉलरशिप परीक्षा*


बेळगांव प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासन सेवेत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बेलगाव विभागातील युवकांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. IAS आणि KAS परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी INDIA4IAS संस्थेच्या वतीने ऑल इंडिया स्कॉलरशिप टेस्ट आयोजित करण्यात आली आहे.

ही परीक्षा रविवार, 31 मे 2026 रोजी बेळगांवातील नागनूर श्री रुद्राक्षी मठ परिसरातील श्री सिद्धरामेश्वर शिक्षण संस्थेच्या आवारात पार पडणार आहे. या उपक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्रतेनुसार 100 टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून बेळगांवसह सीमाभागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी महांतेश वक्कुंद फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 99024 04443 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*