LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

विश्वकर्मा समाजाच्या 86 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

बेळगाव : श्री विश्वकर्मा सेवा संघ, बेळगाव यांच्या वतीने सातवी, दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विविध शैक्षणिक स्तरांवर उत्कृष्ट गुण मिळवलेल्या एकूण 86 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करताना समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे कृष्णा सुतार आणि सचिन सुतार उपस्थित होते. प्रमुख वक्ते शशिकांत सुतार यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला. मोबाईलचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर ज्ञानवृद्धीसाठी आणि अभ्यासासाठी करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच यश मिळवण्यासाठी वेळेचे नियोजन आणि शिस्तबद्ध अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसूरकर आणि श्री विश्वकर्मा सेवा महिला संघाच्या अध्यक्षा गीता सुतार यांनी संघाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमात केवळ विश्वकर्मा समाजातीलच नव्हे तर इतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी नामदेव लोहार, वैजनाथ लोहार, प्रशांत बेळगावकर, संदीप मडोळकर, प्रकाश कम्मार, वासुदेव बडगेर, सोमशेखर सुतार, गोपाल लोहार, दिनेश सुतार, फोडू सुतार, श्रीधर लोहार, किरण सुतार, प्रदीप कम्मार, मारुती सुतार, विनायक लोहार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*