Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात*

कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात; अक्षतारोपण सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी बुद्रुक येथे प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रोत्सवाची आज पहाटेपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. सकाळी नेमक्या ५ वाजून ४८ मिनिटांनी पार पडलेल्या अक्षतारोपण विधीने यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

या प्रसंगी समाज कल्याण व महिला आणि बाल विकास मंत्री तसेच बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर, विधान परिषदेचे सदस्य चनराज हट्टीहोळी, युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून यात्रेचे महत्त्व अधोरेखित केले. याशिवाय पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे अक्त सहाय्यक मलगौडा पाटील, नगरसेवक श्रेयश नाकाडी तसेच यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले की, कंग्राळी बुद्रुक येथील महालक्ष्मी यात्रा ही गावाच्या परंपरेचा अभिमान असून ती 43 वर्षांनी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गावातील सर्व विकासकामे पूर्ण करण्यात आली असून यात्रेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यात्रेच्या पुढील कार्यक्रमानुसार, मंगळवारी रथोत्सव पार पडणार असून बुधवारी सायंकाळी देवी गदगेवर विराजमान झाल्यानंतर यात्रेला औपचारिक सुरुवात होणार आहे.

दरम्यान, यात्रेनिमित्त कंग्राळी बुद्रुक गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून लाखो भाविकांनी गावाकडे ओढा घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*