Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*किरकोळ भांडणातून आजीची हत्या; नातू पोलिसांच्या ताब्यात*

बेळगाव जिल्ह्यातील अगसगे गावात कौटुंबिक वादातून थेट हत्येपर्यंत पोहोचलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. शनिवारी रात्री झालेल्या या प्रकारात संतापाच्या भरात नातवाने स्वतःच्या आजीवर धारदार चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळव्वा कलगौडा पाटील (वय ७०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कलगौडा अप्पय्यागौडा पाटील (वय २४) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काकती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, घरातील किरकोळ कारणावरून आजी आणि नातवामध्ये जोरदार वाद झाला होता. वाद वाढत गेल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणाने घरातील चाकू उचलून आजीवर वार केल्याचे समोर आले आहे.

घटनेनंतर जखमी अवस्थेतील वृद्ध महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी पोहोचलेल्या काकती पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*