LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*

 

दि.8 सप्टेंबर या दिवशी मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये 'जागृती मंचतर्फे 'आरोग्य भान-किशोरावस्था: वाढ व विकासाचा टप्पा 'इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना समजावण्यात आला. यावेळी शाळेची माजी विद्यार्थिनी असलेल्या आणि सध्या शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ कीर्ती अभय बिर्जे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वयानुसार होणारी वाढ, मासिक ऋतुचक्र, हा प्रवास आनंददायक कसा बनवावा? यासारख्या 

काही प्रश्नांवर प्रकाश पाडण्यात आला. किशोरावस्था म्हणजे साधारणपणे १० ते १९ वर्षांचा काळ असून हा बालपण आणि प्रौढत्वाच्या मधला महत्त्वाचा टप्पा आहे. या वयात मुला-मुलींच्या शरीरात हार्मोनल बदलांमुळे उंची, वजन आणि शारीरिक रचनेत झपाट्याने बदल होतात. शारीरिक बदलांसोबतच मानसिक पातळीवर तीव्र भावनिक चढ-उतार, चिडचिड आणि स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची ओढ निर्माण होते. या काळात मुले पालकांपेक्षा मित्र-मैत्रिणींच्या संगतीला जास्त महत्त्व देतात, ज्यामुळे या वयाला वादळ आणि संघर्षाचा काळ मानला जातो ,डाॅ.कीर्ती बिर्जे यांनी पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांना समजावले.

      कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका तसेच जागृती मंच प्रमुख नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर,शेती प्रमुख अरूण बाळेकुंद्री, शिक्षक गजानन सावंत, स्नेहल पोटे, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.सातवीची विद्यार्थिनी तन्मयी पावले हिने आभार मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*