Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*यांना मिळाली मेडिकल सर्जिकल नर्सिंग) या विषयात डॉक्टरेट पदवी*

यांना मिळाली मेडिकल सर्जिकल नर्सिंग) या विषयात डॉक्टरेट पदवी

कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट,घटप्रभा येथील प्राध्यापिका. वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांनी "कर्नाटकातील निवडक रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये आढळलेल्या जीवनशैलीतील बदलांबद्दलच्या होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण व अध्ययन (मेडिकल सर्जिकल नर्सिंग) या विषयात डॉक्टरेट पदवी मिळविली आहे.

मध्य प्रदेश येथील मालवांचल विद्यापीठ इंदोर मधून ही डॉक्टरेट पदवी संपादित केली. हे विद्यापीठ भारतीय परिचारिका परिषद (Indian Nursing Council) मान्यताप्राप्त दर्जाचे आहे. यापूर्वी प्रा. सई पाटील यांनी कर्नाटकातील राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठातून एमएससी नर्सिंग ही पदवी संपादित केली. त्यानंतर त्यांनी बेळगाव शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ नर्स म्हणून काम पाहिले. हे करत असताना त्यांनी वरील विषयावर प्रबंध सादर केला. त्यानंतर त्यांना सदर विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. प्रा. सई पाटील यांनी सुरुवातीपासूनच वैद्यकीय क्षेत्रामध्ये विविध विभागात काम केले आहे. त्या स्व. प्रा. सी. व्ही. पाटील यांच्या स्नुषा होत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*