Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; महागाईचा पुन्हा भडका*

नवी दिल्ली : देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा धक्का बसला आहे. पश्चिम आशियामध्ये वाढत चाललेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता थेट भारतीय बाजारपेठेवर दिसून येत असून, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली.

तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३ रुपये १४ पैशांची वाढ केली असून, डिझेल ३ रुपये ११ पैशांनी महाग झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ही या दरवाढीमागची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे तर CNG, घरगुती गॅस, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. CNG च्या दरातही प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

याशिवाय सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने सराफा बाजारातही मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात महागाई आणखी तीव्र होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच पेट्रोल पंप चालकांना ई-मेलद्वारे दरवाढीबाबत सूचना दिल्या होत्या. जागतिक बाजारातील अस्थिरता कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत आणखी दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*