Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*सीबीएसई ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘शाळा प्रारंभोत्सव उत्साहात संपन्न*

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी १ एप्रिल रोजी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित,सीबीएसई ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात ‘शाळा प्रारंभोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शाळा सजवण्यात आली होती. या विशेष सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक मनोज सर आणि इयत्ता दहावीचे विद्यार्थी श्रवण बेन्नाळकर व कृतिया जांबोटकर यांनी प्रमुख पाहुण्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आणले. संगीत शिक्षिका अक्षता मॅडम आणि विद्यार्थ्यांनी मधुर स्वरात प्रार्थना सादर केली. यावेळी श्रीमती मायादेवी अगसगेकर मॅडम (सल्लागार संचालक) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी प्राचार्या श्रीमती सोनाली मॅडम यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तर नवनियुक्त प्राचार्य श्री. प्रदीप पाटील सर यांनी आपला पदभार स्वीकारत उज्ज्वल भविष्यासाठी संवाद साधला. शाळेच्या शिक्षिका शांता मॅडम यांनी सर्वांचे स्वागत केले.

या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे संगीत विभागातर्फे सादर केलेले ‘राइज,शाइन अँड सोर’, हे थीम साँग आणि शिक्षकांनी सादर केलेला बहारदार नृत्यविष्कार. बालवाटिकेतील चिमुकल्यांसाठी ‘अक्षर अभ्यास हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये धान्यावर अक्षरे गिरवून मुलांनी शिक्षणाचा श्रीगणेशा केला आणि आपला आनंद व्यक्त केला. तसेच, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून “स्वप्नांना द्या नवी भरारी” अशा आशयाचे संदेश देत नव्या वर्षाचे स्वागत केले.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या वार्षिक परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यानंतर सर्व वर्गशिक्षकांची ओळख करून देण्यात आली. संपूर्ण शाळेने नवीन वर्षाची प्रतिज्ञा घेतली. मैदानावर शालेय समन्वयकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेचा परिसर आकर्षक सजावटीने आणि सुविचारांनी प्रसन्न दिसत होता. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*