LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*खानापूर तालुक्यात हत्तींचा कहर; शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त, वनविभाग गाढ झोपेत!*

खानापूर तालुक्यात हत्तींचा कहर; शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त, वनविभाग गाढ झोपेत!

खानापूर (प्रतिनिधी) – खानापूर तालुक्यातील जंगलालगतच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हत्तींच्या कळपाने थैमान घातले आहे. प्रचंड मेहनतीने पिकवलेली शेती काही क्षणात उध्वस्त होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वनविभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप वाढत आहे.

गेल्या पंधरवड्यापासून मास्केनट्टी, भूरणकी, करिकट्टी, गस्टोळी या गावांमध्ये हत्तींचा उपद्रव सातत्याने सुरू आहे. हे हत्ती दिवसेंदिवस लोकवस्तीच्या दिशेने सरकत असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी मास्केनट्टी गावाजवळ हत्तींच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली.

स्थानिकांनी हत्तीला हाकलण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी वनअधिकाऱ्यांकडून मदतीचा हात अजूनपर्यंत मिळालेला नाही. “वनविभागाचे अधिकारी केवळ पाहुण्याच्या भूमिकेत आहेत, आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी स्वतःच झगडावे लागत आहे,” अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शेती हा एकमेव आधार असलेल्या ग्रामीण शेतकऱ्यांना हत्तींच्या हल्ल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो. नुकसानभरपाई मिळण्यातही अनेकदा दिरंगाई होत असल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतात. काही शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.

ग्रामस्थांनी वनमंत्री, आमदार आणि जिल्हा प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून हत्ती हल्ल्यांपासून संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांनी हत्तींच्या हालचालींचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, संपूर्ण परिसरात या घटनेबाबत चिंतेचे वातावरण आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*