Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*समर्थ नगर परिसरात महिलेनं विहिरीत उडी मारून संपवले जीवन*

समर्थ नगर परिसरात महिलेनं विहिरीत उडी मारून संपवले जीवन

बेळगाव शहरातील समर्थ नगर परिसरात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. एका महिलेने अज्ञात कारणातून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला आज (८ ऑक्टोबर) सकाळी घरातून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान, परिसरातील एका विहिरीजवळ तिच्या चप्पल दिसल्याने स्थानिकांना संशय आला. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि एच.ई.आर.एफ. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बचाव कार्य तत्काळ सुरू करण्यात आले. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मोहिमेत बसवराज, पद्मप्रसाद हुळी आणि राजू यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, तर समाजसेवक अवधूत तुडयेकर यांनी बचाव कार्यात सहकार्य केले.

सदर महिलेची ओळख पटली असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनेचा सखोल तपास करीत आहेत.

https://youtube.com/shorts/NMkfkCAYrNE?si=k_s2hYJKT2kGCW-W

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*