Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*श्री भगवान महावीर सिद्धायतन विद्यार्थी वसतिगृहाचे बुधवारी उद्घाटन*

श्री भगवान महावीर सिद्धायतन विद्यार्थी वसतिगृहाचे बुधवारी उद्घाटन
बेळगाव- "येथील
जैन युवक मंडळ ट्रस्ट, बेळगावी या संस्थेने गेली पन्नास वर्षे सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय सेवा बजावली असून या संस्थेच्या वतीने २१ एकराच्या विशाल परिसरात बम्बरगे येथे उभारलेल्या सिद्धायतन वसतिगृहाचे उद्घाटन धर्मस्थळचे धर्माधिकारी पद्मविभूषण डॉ डी.वीरेंद्र हेगडे यांच्या हस्ते संपन्न होत आहे" अशी माहिती ट्रस्टचे चेअरमन भूषण मिरजी यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की "जैन युवक मंडळाच्या वतीने सध्या हिंदवाडी येथील महावीर भवन, बम्बरगे चे श्री भगवान महावीर जैन इंग्लिश मीडियम रिसिडेन्शियल स्कूल आणि मुनी विहार असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.गेल्या अनेक दशकांपासून, ट्रस्ट बाल संस्कार शिबिर, विद्वत्तापूर्ण प्रवचन, धार्मिक शिबिर, शैक्षणिक कार्यक्रम आणि समाजकल्याणकारी उपक्रमांचे सक्रियपणे आयोजन करीत आहे, ज्यामुळे नैतिकदृष्ट्या मजबूत, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि अध्यात्मिकदृष्ट्या प्रबुद्ध तरुणांचे संगोपन करण्याचे कार्य सुरू आहे.

जैन युवक मंडळाचा हा वारसा पुढे नेत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की श्री भगवान महावीर सिद्धायतन या आधुनिक विद्यार्थी वसतिगृहाचे भव्य उद्घाटन म्हणजे चांगले, सुसंस्कृत, धार्मिक अधिष्ठान असलेले विद्यार्थी निर्माण करणे साध्य होणार आहे.

या प्रकल्पा बाबतची माहिती देताना ट्रस्टी सुधर्म मूडलगी यांनी सांगितले की,"1969 साली राम कस्तुरी, बाळासाहेब पाटील, मनोहर पाटील, रमेश चिवटे, अजित अवलक्की, राजकुमार शाह व महावीर पत्रावळी यांच्यासारख्या धुरीनानी या मंडळाची स्थापना केली. महावीर भवन 1987 साली तयार झाले त्यानंतर भूतरामहट्टी येथे 2000 साली 21एकर जागा घेतली आणि श्री भ. महावीर जैन इंग्लिश मीडियम रिसिडेन्शियल स्कूल सुरू केली त्या शाळेत सध्या सर्व जाती धर्माचे सुमारे 800 विद्यार्थी शिक्षण घेत असून तेथे नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.
त्यानंतर नष्ट होत चाललेली गुरुकुल परंपरा पुढे नेण्यासाठी म्हणून आम्ही या शाळेत विद्यार्थ्यांना अत्यंत चांगले शिक्षण देतो त्यासाठी होस्टेल बांधायचा निर्णय घेतला. हे काम 2023 साली बेल्जियमचे राजीव राख्या यांनी पाहिले आणि त्यांनी मूल्याधारीत संस्था सुरू करण्यास मदत करण्याची घोषणा केली. त्यांच्या भूमिका आम्ही सिद्धायतन हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज 22 खोल्या तयार असून तेथे जैन धर्मातील 70 विद्यार्थी राहुन शिक्षण घेत आहेत.

येत्या काही वर्षात सिद्धायतन ची चार मजली इमारत पूर्ण होणार असून एकंदर अडीचशे विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली जाणार आहे. ही शाळा सुरू करण्यापूर्वी आम्ही जयपूर ,इंदोर, गुजरात, दिल्ली अशा अनेक ठिकाणच्या शाळा व हॉस्टेल्स पाहिली आहेत.
या उद्घाटन सोहळ्यासश्री अभय पाटील, आमदार,
श्री धन्यकुमार गुंडे , उपाध्यक्ष, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग,
श्री संजय पाटील ,भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार,डॉ. प्रभाकर कोरे अध्यक्ष, केएलई सोसायटी,
श्री सुनील हणमन्नावर, राज्य काँग्रेस सरचिटणीस,
डॉ. गोपाल जिनगौडा, उद्योगपती,श्री राजीव राख्या, उद्योजक (बेल्जियम),डॉ. विनोद दोड्डन्नावर ,सचिव, भरतेश एज्युकेशन ट्रस्ट,डॉ. एन. ए. मगदूम,शिक्षणतज्ज्ञ, अंकली,श्री महावीर पडनाड अध्यक्ष, प्राथमिक कृषि सहकारी संघ, सन्कोनट्टी,
श्री भूषण मिर्जी,व श्री राम कस्तुरी, विश्वस्त, जैन युवक मंडळ ट्रस्ट ,बेलगावी
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
"सध्या फक्त मुलांचे होस्टेल असून नजीकच्या काळात मुलींसाठी सुद्धा स्वतंत्रहोस्टेल सुरू करण्यात येणार आहे" अशी माहिती यावेळी ट्रस्टी सुहास हूलबत्ते यांनी दिली.
या पत्रकार परिषदेप्रसंगी रमेश चिवटे, नेमेश सुजी,सुहास मोहिरे आदी ट्रस्टी उपस्थित होते

या वसतिगृहाचा तळमजला बांधन्यासाठी श्री एल. डी. शाह (मुंबई) यांचे उल्लेखनीय सहकार्य मिळाले आहे.

जैन युवक मंडळ ट्रस्ट या ऐतिहासिक कार्यक्रमाला सहर्ष उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*