LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*

 दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प येथे स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य श्री. मनोहर करडी, सर्व शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते. नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. मनो‍ज सरांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध मार्चपास्ट सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी व कन्नड भाषेत प्रभावी भाषणे, देशभक्तिपर समूहगीत, हिंदी काव्यवाचन व समूह नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या मास्टर रिधान पाटील व मास्टर शौर्य खन्नुकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “स्वातंत्र्यदिन केवळ देशभक्तीचा पोशाख परिधान करण्यापुरता मर्यादित नसून, स्वातंत्र्यवीरांची ओळख, त्यांचा त्याग आणि राष्ट्रासाठीचे योगदान जाणून घेण्याचा दिवस आहे,” असा प्रेरणादायी संदेश दिला. देशप्रेम, शिस्त, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत हा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*