LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*माऊली सोसायटीचा पुढाकार; यात्रेसाठी ₹२५ हजारांची मदत*

कंग्राळी बीकेमध्ये महालक्ष्मी यात्रेची धामधूम; माऊली सोसायटीकडून २५ हजारांची देणगी

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बीके गावात आगामी २८ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध विकासकामांना गती देण्यात आली असून बहुतेक कामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहेत.

गावातील सर्व मंदिरांची रंगरंगोटी आणि परिसर सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक संस्था आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.
याच अनुषंगाने माऊली को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने यात्रेसाठी २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या उपस्थितीत ही रक्कम महालक्ष्मी यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्ष व सचिवांकडे सुपूर्द करण्यात आली.
या वेळी यात्रा समितीच्या वतीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा भगवा शाल देऊन सन्मान करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन प्रभाकर पाटील, व्हाईस चेअरमन मनोहर कडोलकर तसेच सदस्य सिद्राय चव्हाण, हनुमंत चव्हाण, अशोक पाटील, मनोहर पाटील आणि नारायण सी. पाटील यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

याशिवाय मनोहर पाटील यांनी ₹५,००१ तर नारायण सी. पाटील यांनी ₹५,००० इतकी वैयक्तिक देणगी देत यात्रेस हातभार लावला.
गावातील नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाची महालक्ष्मी यात्रा अधिक भव्य आणि उत्साहपूर्ण होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*