LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये जागृती मंच उद्घाटन सोहळा संपन्न*

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागृती मंच उद्घाटन सोहळा संपन्न
मराठी विद्यानिकेतनमध्ये समाजभान जपण्यासाठी जागृती मंच स्थापन करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे डॉ. शिवाजीदादा कागणीकर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात' सदैव सैनिका पुढेच जायचे 'या स्फूर्तीगीताने संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांच्या मार्गदर्शनाने आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे यांनी केले. डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांचे स्वागत शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जागृती मंचाच्या फलकाचे उद्घाटन केले. उद्घाटक फलक शाळेचे माजी विद्यार्थी अजय सपकाळे यांनी बनवला आहे.सध्याच्या हवा बदलाला आपण माणूसच जबाबदार आहोत, वाहनांची संख्या वाढली, असे होणारे प्रदूषण आपण थांबवले पाहिजे.

कामापुरताच दिव्यांचा वापर करणे, थनबर्ग ग्रेटाची पर्यावरण संदर्भातील लढाई प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर यांनी आपल्या मनोगतात मांडली. शिक्षण समन्वयक सविता पवार यांनी जागृती मंचाची उद्दिष्टे स्पष्ट केली. ज्यामध्ये सेंद्रिय शेती, संविधान लोकशाही, पर्यावरण ,कला या सर्वांचा अभ्यास केला जाईल. यासाठी इयत्ता सातवी व आठवी वर्गाचे विद्यार्थी जागृती मंचातील कार्यक्रम अनुभवतील.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार , अरूण बाळेकुंद्री ,शिक्षकवर्ग, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका रुपाली हळदणकर यांनी केले. आभार प्रदर्शन माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*