Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात जयंत पाटील यांची दळवी कुटुंबीयांना भेट*

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री व विद्यमान खासदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी बेळगावात भेट दिली.

टिळकवाडी येथील निवासस्थानी पोहोचताच पाटील यांनी प्रथम दळवी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दळवी यांच्या अखेरच्या क्षणांबाबत माहिती जाणून घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

सीमा प्रश्नासाठी आयुष्य झोकून देणारे झुंजार नेते म्हणून ओळख असलेले दीपक दळवी यांचे मंगळवारी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सीमाभागात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

या भेटीदरम्यान दळवी यांचे सुपुत्र बुलंद दळवी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.

यानंतर जयंत पाटील यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत सीमाभागातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. सीमावादासंदर्भातील घडामोडींवर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*