LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*ज्योती सेंट्रल स्कूलच्या शिफाली कांबळेचे राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत घवघवीत यश*

बेळगाव | प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. शाळेतील इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेली कु. शिफाली संतोष कांबळे हिने राष्ट्रीय स्तरावरील वैयक्तिक नृत्य स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

बीदर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘नॅशनल लेव्हल डान्स कॉम्पिटिशन (KWC Dance Competition)’ मध्ये देशभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये शिफालीने आपल्या बहारदार सादरीकरणाने परीक्षकांची विशेष दखल घेतली. तिच्या सशक्त भावअभिनय, तालबद्ध हालचाली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला परीक्षकांकडून मोठी दाद मिळाली.

या यशाबद्दल शिफालीला मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र तसेच ७ हजार रुपये रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध कोरिओग्राफर कार्तिक प्रियदर्शन यांनी केले.

शिफालीच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेचे एस.एम.सी. चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे, मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर, शिक्षकवृंद तसेच पालकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शिफालीच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*