Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*प्रजासत्ताक दिनी कंग्राळी बिकेच्या कावेरी सूर्यवंशीचा सुवर्ण सन्मान*

प्रजासत्ताक दिनी कंग्राळी बिकेच्या कावेरी सूर्यवंशीचा सुवर्ण सन्मान

बेळगांव:प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कंग्राळी बिके येथील कन्नड हायर प्रायमरी स्कूलची विद्यार्थिनी कुमारी कावेरी सूर्यवंशी हिच्या उल्लेखनीय क्रीडा यशाचा गौरव करण्यात आला.

सध्या इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कावेरीने कर्नाटका ओपन राज्यस्तरीय जुडो चॅम्पियनशिप 2025-26 मध्ये सुवर्णपदक पटकावत राज्य पातळीवर शाळेचे व गावचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल तिचा शाळेच्या प्रांगणात ग्रामपंचायत सदस्य रेखा इंडीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कावेरी सूर्यवंशी हिने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्हास्तरीय डिपार्टमेंट स्पोर्ट्स,
कर्नाटका शैक्षणिक राज्यस्तरीय डिपार्टमेंट स्पोर्ट्स (बेलगाम),
मिनी कर्नाटका क्रीडा खेळाडू 2025 (बेंगळुरू),
कर्नाटका DYES स्पोर्ट्स हॉस्टेल जुडो स्पर्धा
या सर्व स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले आहे.
राष्ट्रीय स्तरावरही तिने आपली छाप सोडत School Games Federation of India आयोजित 69 व्या नॅशनल स्कूल गेम्स जुडो चॅम्पियनशिप 2025-26 (लुधियाना, पंजाब) येथे कांस्यपदक मिळवले आहे.
कावेरीला DYES हॉस्टेलच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका व पदकविजेत्या रोहिणी पाटील (एकलव्य आवडी) तसेच आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या सन्मान सोहळ्यावेळी ग्रामपंचायत सदस्य, एसडीएमसी अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य, आर.एस.भजंत्री  (मुख्याध्यापक),सुवर्णा जी. कल्लिमठ (सहशिक्षिका, इयत्ता 6 वी, द्विभाषिक इंग्लिश मीडियम),
पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कावेरीच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाक्षेत्रात पुढे जाण्याची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*