LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये राजा शिवछत्रपती जयंती साजरी*

मराठी विद्यानिकेतनमध्ये राजा शिवछत्रपती जयंती साजरी

मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये‌ 19फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या शाळेतील शिक्षिका कमल हलगेकर उपस्थित होत्या. यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी इयत्ता चौथी'ब'चे वर्गशिक्षक प्रसाद सावंत यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केला. अनन्या सूर्यवंशी व समर्थ पाटील यांनी शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शक्ती सिद्राय टुमरी व भक्ती सिद्राय टुमरी या दोघींनी शिवगर्जना सादर केली. संकल्प हळदणकर याने पोवाडा तर संगीत विभागातर्फे 'एकच राजा इथे जन्मला' हे शिवाजी महाराजांचे गाणे सादर करण्यात आले. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली.

जाणता राजा, रयतेचा राजा,स्रियांप्रती आदर , त्यांच्या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन एकूणच शिवाजी महाराजांच्या जीवनप्रसंगांची मांडणी चौथीच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके व प्रतिकृतीमधून केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील , शिक्षक समन्वयक सविता पवार व सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार चौथीची विद्यार्थिनी आरोही पाटील हिने केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*