Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*“विकासासाठी पक्षभेद विसरूया” — राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांचे आवाहन;*

“विकासासाठी पक्षभेद विसरूया” — राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांचे आवाहन; कल्लेहोळ येथे आधुनिक बसस्टँडचे उद्घाटन

बेळगाव (प्रतिनिधी):
बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावात राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या आधुनिक बसस्टँडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

या प्रसंगी बोलताना खासदार कडाडी म्हणाले, “निवडणुकीच्या काळात पक्षाचे राजकारण करावे, पण निवडणुकीनंतर सर्वांनी एकत्र येऊन गावाचा विकास साधावा. विकासासाठी पक्षभेद न ठेवता सर्व समाजघटकांनी हातभार लावावा,” असे ते म्हणाले.

भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी या प्रसंगी सांगितले की, खासदार कडाडी यांनी जिल्ह्यातील 100 बसस्टँडच्या उभारणीला मंजुरी दिली असून गेल्या तीन महिन्यांत 30 बसस्टँडचे उद्घाटन झाले आहे. उर्वरित 35 बसस्टँडचे काम जलद गतीने सुरू असून उर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील, असे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, “इराण्णा कडाडी यांची काम करण्याची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखीच वेगवान आणि परिणामकारक आहे. भूमिपूजनानंतर काम तात्काळ सुरू करून अल्पावधीत उद्घाटनापर्यंत पोहोचवणे ही त्यांची खासियत आहे,” असे जाधव म्हणाले.

या कार्यक्रमाला बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर, रामचंद्र मन्नोलकर, पवन देसाई, साईनाथ पाटील तसेच सुलगा ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*