Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

मराठा मंडळ पॉलिटेक्निक अ‍ॅल्युमनीचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

मराठा मंडळ पॉलिटेक्निक अ‍ॅल्युमनी असोसिएशनतर्फे दिनांक 27 डिसेंबर रोजी ‘एकत्वम्’ या अर्थपूर्ण नावाने भव्य अ‍ॅल्युमनी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे माजी विद्यार्थी, संस्था आणि सध्याचे विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ झाले.
या स्नेहमेळाव्याला मराठा मंडळ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या अध्यक्षा डॉ. राजेश्री नागराजू यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती दर्शवली. त्यांच्यासमवेत पॉलिटेक्निकचे प्राचार्य आर. एस. सूर्यवंशी, उपप्राचार्या आशा तोरवी, अ‍ॅल्युमनी सचिव चेतन बैलूर, खजिनदार सचिन वांगिकर, उपाध्यक्ष शोधन चौगुले, तसेच शिवानी पाटील व मानसी सोमनाचे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पॉलिटेक्निकचे 100 हून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. दीर्घकाळानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची भावना व्यक्त केली.
यावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विभागाला शासन शुल्क शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. तसेच उद्याच्या गरजा लक्षात घेऊन पॉलिटेक्निकसाठी उच्च दर्जाची साउंड सिस्टीम अ‍ॅल्युमनी असोसिएशनकडून देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली.
सिव्हिल विभागाचे माजी विद्यार्थी श्री. विश्वनाथ लेक्कड यांनी संस्थेच्या विकासासाठी १ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. यासह भविष्यात आणखी आर्थिक व पायाभूत सहकार्य करण्याचा निर्धार सर्व माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या नृत्य व गायन सादरीकरणांनी कार्यक्रमात रंगत भरली. या मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर आनंदी आणि उत्साही वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग पिंगट, दीपक तराळे, गौरी उप्पीन, बहुराव मोरे यांनी विद्यार्थी समन्वयकांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा स्नेहमेळावा संस्मरणीय ठरला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*