LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*"मराठा तरुणाईला व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याची गरज आहे"*

"मराठा तरुणाईला व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याची गरज आहे"

बेळगाव: “मराठा समाजातील तरुणाई आज मोबाईल आणि व्यसनांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यांना या दुष्परिणामांपासून मुक्त करून स्पर्धात्मक परीक्षांमधून यश मिळवून अधिकारी बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे,” असे मत काडा अध्यक्ष युवराज कदम यांनी व्यक्त केले.

ते बेळगाव शहरातील श्री जत्तीमठ देवस्थान येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. या कार्यक्रमात मैसूर दसरा स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या कुस्तीपटू, त्यांच्या प्रशिक्षकांचा तसेच स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यंदाच्या मैसूर दसरा कुस्ती स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याने 53 वर्षांनंतर “कर्नाटक कंटीरव केसरी” हा मानाचा किताब मिळवला आहे.
या यशाबद्दल पैलवान कामेश पाटील, त्यांचे प्रशिक्षक एनआयएस कोच प्रशांत पाटील आणि इतर विजेत्या मल्लांचा गौरव करण्यात आला.

कोच स्मिता पाटील यांनी सांगितले, “या वर्षी बेळगावच्या मुलींनी मेडलची लयलूट केली आहे. आमचा हेतू पुढील वर्षी दुप्पट यश संपादन करण्याचा आहे.”
त्याचबरोबर दसरा किशोरी स्वाती पाटील (कडोली) हिने “गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे हे यश मिळाले” असे मनोगत व्यक्त केले.

कंग्राळी खुर्द येथील श्रुती पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक (PSI), यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले, “स्पर्धात्मक परीक्षांची भीती न बाळगता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील होते. त्यांनी सांगितले की, “समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा पाया रचणे होय.”
वकील अमर येळ्ळूरकर आणि समाजनेते किरण जाधव यांनीही यशस्वी तरुणाईचे कौतुक करत, “समाजाने त्यांच्या मागे उभे राहणे ही काळाची गरज आहे,” असे सांगितले.

कार्यक्रमात सकल मराठा समाजाचे शिवराज पाटील, नागेश देसाई, प्रशांत भातकांडे, माजी उपमहापौर संजय शिंदे, रेश्मा पाटील, राजू बिर्जे, प्रवीण पाटील, माधुरी जाधव, सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पाटील यांनी केले तर आभार शरद पाटील यांनी मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*