LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*राजहंस गडावर मराठी भाषादिन सोहळा मोठया उत्साहात*

*राजहंस गडावर मराठी भाषादिन सोहळा मोठया उत्साहात*

“भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल!” — सीमाकवी रवींद्र पाटील

मराठी राज्यभाषा दिन व ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकिकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने ऐतिहासिक राजहंस गड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीसमोर मराठीचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

सुरुवातीला माजी एपीएमसी सदस्य व येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते वामनराव पाटील, महेश जुवेकर, धनंजय पाटील,राजू पावले,अशोक घगवे व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते गडावरील श्री सिद्देश्वर मंदिरात जाऊन पूजा आरती करण्यात आली.

त्यानंतर ज्येष्ठ नेते शिवाजी हावळाणाचे, खानापूर समितिचे नेते गोपाळ पाटील,धामणे महाराष्ट्र एकीकरण समितीचे यल्लाप्पा रेमाणाचे,प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, मनोहर हुंदरे,मोतेश बारदेशकर,निलेश काकतकर व इतरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पदपूजन करून सिद्दाप्पा पुजारी यांनी मंत्रोच्चार म्हटले.

कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त हा मराठी भाषा दिन साजरा केला जातो म्हणून त्यांच्या प्रतिमेला खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, नगरसेवक व युवा समिती सीमाभागचे खजिनदार शिवाजी मंडोळकर, पांडुरंग सावंत, महादेव येळवी, शिवाजी जाधव,गुणवंत पाटील,रवी पाटील,संजय मोरे,एम.वाय. घाडी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सीमाकवी रवींद्र पाटील यांनी

“भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल; आणि संस्कृती टिकली तरच आपली अस्मिता जिवंत राहील.”

मराठीची अभिजात परंपरा, संत-साहित्याचा वारसा आणि बेळगाव सीमाभागातील मराठी बांधवांची जिद्द यांचा गौरव करत त्यांनी सीमाबांधवांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

राजहंस गडावर दुमदुमलेला मराठीचा जयघोष हा केवळ उत्सव नव्हता, तर मराठी अस्मितेचा जाज्वल्य संकल्प होता, असे या प्रसंगी गौरवोद्गार काढले.

ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कवीतेच्या दोन ओळी ऐकवताना सीमाभागातील मराठी भाषिक अन्यायाविरूद्ध कसा लढतोय आणि ठिक ठिकाणी होणारा मराठी भाषादिन ही त्याची प्रचिती आहे, महाराष्ट्रात झाला नाही तेवढ्या भव्य प्रमाणात इथे हा दिन साजरा केला जातोय,मराठी माणूस हा इथला भूमिपुत्र असून ही जमीन त्याच्या हक्काची आहे म्हणूनच तो आपल्या हक्कासाठी लढतोय आणि त्यासाठीच सीमाभागातील मराठी माणसाने आपली एकीची वज्रमुठ आवळली पाहिजे असे आवाहन केले.

शिवसंत संजय मोरे यांनी शिवाजी महाराजांनी मराठी शब्दकोष तयार करून शिवकालीन व्यवहार हा मराठी भाषेत व्हावा यासाठी सर्व व्यवहारिक भाषा ही मराठीत केली आणि हा आम्हा मराठी भाषिकांचा अभिमान आहे. जगभरात दहाव्या क्रमांकावर असलेली मराठी भाषा ही वैज्ञानिक भाषा बनली पाहिजे व तसे झाल्यास ती पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी वेळ लागणार नाही. असे गौरवोद्गार काढले.

यावेळी शिवाजी जाधव यांच्यासह अनेकांची समयोचित अशी भाषणे झाली व मराठी भाषेच्या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने १५ मार्च पासून सुरू होणाऱ्या मराठी सन्मान यात्रेला शुभेच्छा देऊन सीमावासीयांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन केले.

सूत्रसंचालन दत्ता उघाडे तर युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी आभार मानले.

यावेळी इंद्रजित धामणेकर, रणजित हवळानाचे,बी.एन. मजुकर,दयानंद

उघाडे, कृष्णा शहापूरकर नागेश बोबाटे, श्रीकांत नांदूरकर, सुरज गोरल, राकेश परीट, नेताजी गोरल, यलुपा पाटील, रमेश धामणेकर,सतिश धामणेकर,

धामणे ग्रामपंचायत अध्यक्ष पंडित पाटील, मनोहर जायानाचे, विजय बाळेकुंद्री परशराम नावगेकर, वामन पाटील,तातोबा मरगानाचे,शिवाजी पाटील,दशरथ याळूरकर,बसवंत यळूरकर,राहुल बाळेंकुंद्री,सुरज जाधव,विश्वनाथ येळूरकर,अभिजीत कारेकर, ज्ञानेश चिकोर्डे,परिणय कदम,गोविंद कुंडेकर,परशराम बैलूरकर,ओंकार बैलूरकर,रोहित जाधव,नीरज जाधव,विनायक मजूकर आदी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*