Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*"मराठी भाषिकांवर दबाव आणू नये"*

बेळगांव:मराठी भाषिकांच्यावर दबाव आणू नये. मराठी भाषिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा येऊ नये अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे. सीमाप्रश्नाच्या संबंधी महाराष्ट्राच्या समन्वय मंत्र्यांनी बैठक घेतली पाहिजे.

समन्वय मंत्र्यांनी येथे आले पाहिजे आणि इथल्या लोकांशी संवाद साधला पाहिजे असे मत महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.बेळगावात एका कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सीमा बांधवांनी कधीही हिंसक मार्गाने आंदोलन केलेले नाही.सीमाप्रश्नाचा सर्वोच्च न्यायालयात लवकर निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे. सीमाप्रश्नाची महाराष्ट्र सरकारने ज्यांना जबाबदारी दिली आहे. त्यांना मी सर्वोच्च न्यायालयात तारखा लवकर घेण्यासाठी विनंती करेन असे आश्वासन देखील जयंत पाटील यांनी दिले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*