Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*17 जानेवारीला कंग्राळी खुर्द येथे हुतात्मा अभिवादन कार्यक्रम*

बेळगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमालढ्याला अधिक बळ देण्याच्या दृष्टीने बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कंग्राळी खुर्द येथे येत्या 17 जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा, तसेच युवा समिती सीमाभाग आयोजित मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

याशिवाय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आगामी डांबर मोर्चात संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

ही बैठक खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिरात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर होते. व्यासपीठावर सचिव एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील आणि विठ्ठल पाटील उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सचिव एम. जी. पाटील यांनी बैठकीमागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला.

प्रास्ताविकात बोलताना माजी आमदार मनोहर किनेकर यांनी 17 जानेवारी 1956 रोजी सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात पाच आंदोलक हुतात्मा झाल्याचा ऐतिहासिक संदर्भ मांडला. सीमावाद न्यायालयात प्रलंबित असला, तरी लोकशाही मार्गाने रस्त्यावरचा संघर्ष तितकाच आवश्यक असून तो अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

येत्या 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कंग्राळी खुर्द येथे होणाऱ्या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, शिवाजी खांडेकर, दीपक पावशे आणि लक्ष्मणराव होनगेकर यांनी आपले विचार मांडत सीमाप्रश्नीचा लढा अधिक व्यापक व संघटित पद्धतीने पुढे नेण्याची आवश्यकता व्यक्त केली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*