Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात मानवतेचा आदर्श; बेवारस वृद्ध महिलेवर सन्मानाने अंत्यसंस्कार*

बेळगावात मानवतेचे दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान वृद्धापकाळामुळे मृत्यू झालेल्या एका बेवारस वृद्ध महिलेला अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी सन्मानाने अखेरचा निरोप दिला.
सदर महिलेचा मृतदेह काही काळ सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात नातेवाईकांच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आला होता. मात्र कोणतीही व्यक्ती पुढे न आल्याने Allan Vijay More आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत Ex-Mayor Vijay More यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. या उपक्रमाला APMC पोलीस स्थानकाचे CPI उस्मान आवटी यांचे सहकार्य लाभले.
पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समन्वयातून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधून सदाशिवनगर स्मशानभूमीत नेण्यात आला. तेथे सर्व धार्मिक विधी आणि अंत्यसंस्कार अत्यंत सन्मानपूर्वक पार पाडण्यात आले.
या वेळी APMC पोलीस स्थानकातील एम. यडहळ्ळी, अवधूत तुडवेकर, अद्वैत चव्हाण पाटील आणि मायकेल पिंटो उपस्थित होते. तसेच शववाहिका सेवेशी संबंधित निशार शमशेर, संजय मेत्री, सदाशिवनगर स्मशानभूमीचे कर्मचारी आणि इतर सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिकही उपस्थित होते.
समाजाकडून विस्मरणात गेलेल्या व्यक्तीलाही अखेरच्या प्रवासात सन्मान मिळावा, या भावनेतून करण्यात आलेल्या या कार्यामुळे Allan Vijay More, Vijay More आणि त्यांच्या टीमच्या मानवतावादी कार्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*