Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मोरारजी देसाई निवासी शाळेत ११९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा*

चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील मोरारजी देसाई निवासी शाळेतील ११९ मुलांना अन्नातून विषबाधा झाली असून जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन निवासी शाळेच्या प्राचार्या आणि वार्डन यांना निलंबित करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या मोरारजी देसाई निवासी शाळेत एकूण ४३९ विद्यार्थी आहेत. यापैकी ११९ मुलांना जेवण आणि नाश्त्यातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना त्रास झाल्यावर चिकोडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी अन्न, धान्य आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

https://youtube.com/shorts/HW0wmGYdwoc?si=-DQJkG29hToHKuzE

उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ११९ विद्यार्थ्यापैकी ३८ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७१ विद्यार्थ्यावर उपचार सुरु आहेत. बालरोग तज्ज्ञ विद्यार्थ्यावर उपचार करत असून वैद्यकीय अधिकारी विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. काही दिवसापूर्वी शाळेची तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकाने उत्तम दर्जाचा भाजीपाला वापरण्या बरोबर स्वयंपाकघर आणि शौचालयाची स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*