LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*महानगरपालिकेत नगरसेवकांचे धरणे आंदोलन;*

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा रोष उसळला आहे. महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या बदलीसंदर्भात सभेत ठराव मंजूर होऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे संतप्त नगरसेवकांनी आज (सोमवारी) मनपा मुख्यालयात ठिय्या आंदोलन छेडले.

महसूल विभागात अनियमितता आणि गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी ‘भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठबळ देणे थांबवा’ अशी घोषणा दिली. निवडून आलेल्या सदस्यांच्या मतांना आणि अधिकारांना प्रशासन किंमत देत नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

महानगरपालिकेच्या सभेत रेश्मा तालिकोटी यांच्या बदलीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र, अनेक तक्रारी असूनही अद्याप त्या पदावर कायम असल्याने संताप वाढला आहे. परिणामी, सत्ताधारी नगरसेवकांनी थेट मनपा आवारातच धरणे आंदोलन केले.

यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी आंदोलकांना संबोधित करत सांगितले, “महसूल उपायुक्तांच्या भ्रष्ट कारभाराला प्रशासनाने छत्रछाया दिली आहे. आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार आहोत. आवश्यक असल्यास सामूहिक राजीनाम्याचाही पर्याय आम्ही विचारात घेत आहोत.”

नगरसेवकांनी बेळगाव मनपेला सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी द्यावेत, तसेच भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ सेवामुक्त करावे, अशी मागणी केली.

या आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे अनेक नगरसेवक उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*