Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कुरण राखण्याच्या पैशांच्या वादातून खून; तीन आरोपींना अटक*

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल उपविभागातील दोडवाड पोलिसांनी एका खूनप्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. कुरण राखण्याच्या कामासाठी दिलेल्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मृत फकीरप्पा किर्कसाली यांचा मृतदेह 29 मे रोजी दोडवाड गावाच्या हद्दीतील एका शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृताच्या पत्नीने पतीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तपासाची दिशा बदलली.

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि विविध तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली. त्यातून मृत व्यक्तीला काही संशयितांनी घटनास्थळाकडे नेल्याचे उघड झाले. पुढील चौकशीत आर्थिक व्यवहार आणि कुरण राखण्याच्या कामावरून आरोपी व मृत यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली.

पोलिसांच्या तपासानुसार, मृत व्यक्तीने कुरण राखण्याच्या कामासाठी काही रक्कम स्वीकारली होती. मात्र, काम सोडून गेल्यानंतर संबंधित आरोपी आणि मृत यांच्यात अनेकदा वाद झाले. घटनेच्या दिवशी झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या फकीरप्पा यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी हाळप्पा जावळी, मंजुनाथ तळवार आणि अर्जुन चुनप्पगोळ यांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय, पीएसआय, स्थानिक पोलिस कर्मचारी तसेच तांत्रिक विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या तपास करून गुन्ह्याचा उलगडा केला. या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*