Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*‘नारी शक्ती वंदन’ कायदा महिला सक्षमीकरणाचा मैलाचा दगड – आमदार शशिकला जोल्ले*

बेळगाव : केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘नारी शक्ती वंदन’ कायद्याचे आमदार शशिकला जोल्ले यांनी जोरदार स्वागत करत, हा निर्णय देशाच्या लोकशाही इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण मिळाल्यामुळे शासनव्यवस्थेत त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल. या माध्यमातून स्थानिक स्तरावरील प्रश्न थेट लोकसभेपर्यंत मांडण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल.

ग्रामपंचायतीपासून संसदपर्यंत महिलांना संधी दिल्यास ‘विकसित भारत’ ही संकल्पना अधिक बळकट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महिलांवरील अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध ठाम आवाज उभारण्यासाठी हे आरक्षण प्रभावी ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

याचबरोबर, आगामी २०२८ च्या निवडणुकांमध्ये बेळगाव जिल्ह्यातून किमान सहा महिला आमदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेलाही या कायद्याचा लाभ होईल आणि अंतर्गत आरक्षणाबाबतचे प्रश्न पंतप्रधानांच्या विशेष अधिवेशनात निकाली निघतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेला भाजपच्या शहराध्यक्षा गीता सुतार, उज्वला बडवण्णाचे, शिल्पा केक्रे, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*