LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*तालुक्यामध्ये नवरात्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ*

तालुक्यामध्ये नवरात्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ
दौडचे उत्साही स्वागत
बेळगाव:
भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण उत्सव मोठ्या भक्तीभावने साजरे केले जातात . यापैकी एक असलेल्या नवरात्रोत्सवाला सोमवारपासून बेळगाव शहराबरोबरच तालुक्यांमध्ये मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी नवदुर्गेच्या एका स्वरूपाची पूजा केली जाते.

माता भगवती आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावाने ओळखली जाते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणच्या मंदिरांना आकर्षक विद्युत रोशनी करण्यात आली आहे . त्याचबरोबर स्वच्छता ही करण्यात आलेली आहे. शहरांमधील कपिलेश्वर ब्रिज, हेमू कलानी चौक परिसर विद्युत रोषणाईने उजळले आहेत.

उत्सवाचे विशेष आकर्षण असलेल्या श्री दुर्गामाता दौडला सोमवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून श्री दुर्गा दौडला प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यान येथून दौडला सुरुवात झाली. तेथून विविध गल्ल्यांमधून जाऊन कपिलेश्वर मंदिर येथे दौडची सांगता करण्यात आली. या दरम्यान श्री दुर्गा दौडचे उत्साही स्वागत करण्यात आले. यावेळी दुर्गा दौड च्या मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. यावेळी दुर्गा माता की जय , जय भवानी जय शिवाजी अशा घोषणानी आसमंत दणाणून गेला. यावेळी भगवे ध्वज, भगव्या पताक्या , भगव्या टोप्या , भगवे शर्ट यामुळे अवघे वातावरण भगवेमय झाल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागातील विविध नवरात्र उत्सव मंडळाकडून दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते.

मंगळवारचा दुर्गा दौडचा मार्ग श्री गणेश मंदिर चन्नमा सर्कल येथून सुरू होऊन विविध मार्गे जाऊन श्री दुर्गा माता मंदिर किल्ला येथे सांगता होणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त दसऱ्यापर्यंत विविध मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिरामध्ये भक्तानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. शहरातील लक्ष्मी मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*