Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगाव सिल्व्हर आर्टिकल्स असोसिएशनची नवीन कमिटी जाहीर; अनिल पोतदार अध्यक्षपदी*

बेळगाव शहरातील जय शंकर भवन येथे सोमवार, 6 एप्रिल 2026 रोजी चांदी उद्योगाशी संबंधित कारखानदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान उद्योग क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व अनिल पोतदार यांनी भूषविले.
बैठकीदरम्यान असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित सदस्यांनी एकमुखाने मंजुरी देत विश्वास व्यक्त केला.

बेळगाव डिस्ट्रिक्ट सिल्व्हर आर्टिकल्स मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी अनिल पोतदार, उपाध्यक्षपदी किरण  प्रकाश शिरोडकर, सचिवपदी राजू कणबर्गी यांची निवड झाली आहे.

तसेच जॉईंट सेक्रेटरी म्हणून बाळकृष्ण दिगंबर आंबरोळे आणि प्रदीप लक्ष्मण तडकोड यांची निवड करण्यात आली असून, कॅशियरपदी सागर बाबुराव मोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जॉईंट कॅशियर म्हणून रघु हावनुर आणि गजानन प्रभाकर नाकाडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

याशिवाय विनायक पत्तार, सचिन चित्रगार, परशुराम मासेकर, कृष्णा कडकोळ, हेमंत कंग्राळकर, रहमान सौदागर आणि विनोद सुंडीकर यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.

सल्लागार म्हणून काळीशी पत्तार, प्रकाश कंग्राळकर, विजय भोसले, सचिन पत्ता, सतीश खमकारट्टी, मुकुंद मलबादी आणि रसूल सनदी यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीत नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*