LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*"नवीन योजना, पण जुनी पाइपलाइन? नागरिकांचा सवाल!"*

बेळगांव : आश्रय कॉलनी आणि सह्याद्री नगर परिसरात जल जीवन मिशन (JJM) योजनेअंतर्गत नवीन पाणी कनेक्शन देण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठ्याची अपेक्षा असताना काही ठिकाणी जुन्या पाइपलाइनलाच नवीन नळजोडणी करण्यात येत असल्याची तक्रार समोर आली आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, योजनेचा मूळ उद्देश पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे हा आहे. त्यामुळे नवीन टाकण्यात आलेल्या पाइपलाइनशीच नवीन कनेक्शन जोडले जावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जुन्या पाइपलाइनमुळे भविष्यात पाणीपुरवठ्याच्या समस्या कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

परिसरातील अनेक भागांमध्ये अद्याप वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नवीन योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि प्रत्येक घरापर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
|
दरम्यान, काही भागांमध्ये नवीन पाइपलाइनसोबतच नवीन कनेक्शनची जोडणी करण्यात आल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित भागातही त्याच पद्धतीने काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

स्थानिकांनी संबंधित विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन कामाची गुणवत्ता तपासावी आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*