LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*दीर्घकालीन जखमांवर नवा उपचार दृष्टिकोन; होमिओपॅथीत प्रगत संशोधन*

बेळगाव : गेल्या १५ वर्षांपासून क्लासिकल होमिओपॅथी क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉ. मनोज एस. पुजार (MD Hom.) यांनी रुग्णसेवा, क्लिनिकल संशोधन आणि आधुनिक उपचार पद्धतींच्या विकासावर भर देत एक नवा आरोग्यदृष्टिकोन मांडला आहे.
अ‍ॅडव्हान्स्ड जर्मन होमिओपॅथिक क्लिनिक अँड हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी दीर्घकाळ न भरून येणाऱ्या जखमा (Chronic Non-Healing Wounds) यांसारख्या गुंतागुंतीच्या आरोग्य समस्यांवर सखोल अभ्यास व संशोधन केले आहे. या अभ्यासातून पारंपरिक होमिओपॅथी आणि आधुनिक जखम व्यवस्थापन यांचा समन्वय साधणारी प्रगत उपचार पद्धती विकसित करण्यात आली आहे.

या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या प्रकृतीचे सूक्ष्म विश्लेषण, वैयक्तिक औषधोपचार, आधुनिक वाउंड केअर तंत्र आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांचा समावेश आहे. या समग्र पद्धतीमुळे दीर्घकालीन जखमांमध्ये तसेच इतर गुंतागुंतीच्या आजारांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

या क्लिनिकमध्ये केवळ जखम उपचारच नव्हे, तर व्हेरिकोज व्हेन्स, व्हेरिकोज अल्सर, हायड्रोसिल, व्हेरिकोसिल, वंध्यत्व, बालरोग, त्वचारोग, हाडे व सांधे विकार, अ‍ॅलर्जी, श्वसनाचे आजार, पचनसंस्था विकार, हार्मोनल असंतुलन आणि इतर अनेक जुनाट आजारांवरही उपचार केले जातात.

रुग्ण प्रत्येक वेगळा असतो, या तत्त्वावर आधारित उपचार पद्धती राबवली जात असल्याचे डॉ. पुजार यांनी स्पष्ट केले. केवळ आजारावर नव्हे तर रुग्णाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थितीचा सखोल विचार करून उपचार दिले जातात. यामुळे शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होण्यास मदत होते.

दीर्घकालीन जखम रुग्णांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत “अ‍ॅडव्हान्स्ड ऑटोमॅटिक ड्रेसिंग बेड” ही विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा उपचार प्रक्रियेला अधिक सुलभ आणि प्रभावी बनवण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे.

संस्थेचे ध्येय संशोधन, नवकल्पना आणि सतत वैद्यकीय प्रगतीच्या माध्यमातून रुग्णांना अधिक दर्जेदार सेवा देणे हे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

“क्लासिकल होमिओपॅथीशी निष्ठा, नवकल्पनांना गती आणि उपचारासाठी समर्पण” हे संस्थेचे मुख्य तत्त्व असल्याचे डॉ. मनोज एस. पुजार यांनी सांगितले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*