Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी*

बेळगाव शहरातील हिंदवाडी गणेश मार्ग परिसरात पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे दूषित पाणी मिसळत असल्याची गंभीर समस्या उभी राहिल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून मोठा त्रास सहन करावा लागत होता.

स्थानिक रहिवाशांनी ही बाब नगरसेवक नितीन जाधव यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून समस्येचे मूळ शोधण्यात आले.

तपासादरम्यान परिसरातील काही ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्यामुळे सांडपाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर महानगरपालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेत दूषित पाण्याचा प्रवाह थांबवला.

संबंधित यंत्रणेकडून आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक व प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी माजी नगरसेविका संयोगिता हलगेकर, महानगरपालिकेचे अधिकारी, एल अँड टी विभागाचे अधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*