Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात शिवजयंतीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे रंगकाम सुरू*

बेळगाव : श्री शिवजयंती उत्सवाच्या औचित्य साधत, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे रंगकाम मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. आज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या व शिवभक्तांच्या उपस्थितीत या रंगकामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी श्री प्रकाश मरगाळे व श्री रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी सांगितले की, बेळगावचा मानबिंदू असलेल्या या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे रंगकाम मागील काही वर्षांपासून झाले नव्हते. त्यामुळे मूर्तीचा रंग जीर्ण झाला होता. यामुळे मंडळाच्या वतीने रंगकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आज या कार्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे काम शिवजयंतीपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, रंगकाम पूर्ण होईपर्यंत नित्यपूजा तात्पुरती बंद राहणार असून शिवभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रसंगी मध्यवर्तीचे कार्यवाह मदन बामणे, शिवराज पाटील, शहापूर शिवजयंती महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, शिवाजी हंगिरकर, दिगंबर पवार, कपिल भोसले, प्रशांत भातकांडे, विकास कलघटगी, उमेश पाटील, महेश जुवेकर, बाळू जोशी, सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, श्रीकांत कदम, सचिन केळवेकर, सुहास हुद्दार, प्रकाश गडकरी, आकाश भेकणे, सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*