Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*यल्लापूरमध्ये ग्रामीण महिला–शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण*

यल्लापूर | 9 डिसेंबर 2025

ICAR-गोवा, काली मंजारो कोडसे आणि ‘जया ऑर्गेनिक प्रोजेक्ट’ (बेंगळुरू–यल्लापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने यल्लापूर तालुक्यातील कोडसे येथे ग्रामीण उद्योजकता आणि पूरक उपजीविकेसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यल्लापूर, अंकोला, हलियाळ आणि मुंडगोड येथील निवडक 32 लाभार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळाला.

प्रशिक्षणानंतर प्रत्येक लाभार्थ्यास 15 देशी कोळी-पिल्ले आणि आवश्यक खाद्यपदार्थांचे मोफत वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात छोटी कुक्कुटपालन युनिट्स उभारून स्थिर उत्पन्न निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.

कार्यक्रमात ICAR–गोवा येथील श्री संजय आणि श्री अमिया यांनी आधुनिक कुक्कुटपालन, पोषण, रोगप्रतिबंधक उपाय आणि बाजारपेठ संधी याबद्दल प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

जया ऑर्गेनिक प्रोजेक्टच्या प्रोजेक्ट ऑफिसर श्रीमती मल्लेश्वरी यांनी लाभार्थ्यांच्या उद्योजकतेसाठी पुढील तांत्रिक सहाय्य व फॉलोअपची माहिती दिली. प्रकल्पाचे उत्तर कन्नड जिल्हा समन्वयक श्री मायकेल कैतान सिद्दी यांनी ग्रामीण समुदायाच्या सहभागाचे कौतुक केले.

कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून

श्रीमती विद्या सिद्दी

श्रीमती मेरी गरिबाचे

श्री मंजीुनाथ राम सिद्दी

यांनी मार्गदर्शन केले.

नाटी कोळी संघ, काली मंजारो सिद्दी सांस्कृतिक संघाचे पदाधिकारी, संस्थेचे सदस्य आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संस्था कर्मचारी श्री विनय आणि श्री गणेश सिद्दी यांनी केले.

या उपक्रमामुळे ग्रामीण स्तरावरील महिलांना, स्वयं-सहाय्य गटांना आणि शेतकऱ्यांना नव्या आर्थिक संधी उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*