LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*१३ वर्षांनंतर मारहाण प्रकरणाचा निकाल*

 

बेळगाव : येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालय हायस्कूलमध्ये हजेरी पुस्तक तपासण्याच्या कारणावरून विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्यावर झालेल्या कथित मारहाण प्रकरणाचा तब्बल १३ वर्षांनंतर निकाल लागला आहे. या प्रकरणातील आरोपी प्रकाश परशुरामभाऊ नंदिहळ्ळी आणि सुहास प्रकाश हुद्दार यांची दुसरे जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळून आलेल्या विसंगती तसेच अभियोजन पक्षाकडून आवश्यक बाबी ठोसपणे सिद्ध न झाल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींना दिलासा दिला.


८ जुलै २०१३ रोजी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास विजय नंदिहळ्ळी हे येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालय हायस्कूलमध्ये गेले होते. हजेरी पुस्तकाची पाहणी करत असताना त्यांच्याशी अटेंडर प्रकाश नंदिहळ्ळी यांचा वाद झाला. हजेरी पुस्तक तपासण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता.

यानंतर विजय नंदिहळ्ळी यांचा मुलगा सागर हा शाळेत पोहोचला. त्यावेळी आणखी काही व्यक्तींना शाळेत बोलावून घेण्यात आल्याचा आणि शाळेचा दरवाजा तोडून विजय व सागर यांच्यावर लोखंडी रॉड व दांड्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

या घटनेत पिता-पुत्र जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. तसेच पुन्हा शाळेत आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला होता.

ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेनंतर विजय नंदिहळ्ळी यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर दुसरे जेएमएफसी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.

या प्रकरणात सुरुवातीला चार जणांविरोधात कारवाई करण्यात आली होती. मात्र, अरुण नंदिहळ्ळी आणि मोईन पठाण यांचे सुनावणीदरम्यान निधन झाल्याने उर्वरित प्रकाश नंदिहळ्ळी आणि सुहास हुद्दार यांच्याविरोधातील खटला पुढे सुरू राहिला.

बचाव पक्षाचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

बचाव पक्षातर्फे अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. केवळ आरोपांच्या आधारे कोणालाही दोषी ठरविता येत नाही, तसेच आरोपींविरोधातील आरोप ठोस पुराव्यांद्वारे सिद्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी मांडले.

फिर्यादी हे विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष असल्याचे सिद्ध करणारा आवश्यक पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नसल्याचाही मुद्दा बचाव पक्षाने उपस्थित केला. तसेच साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती असल्याने अभियोजन पक्षाचा दावा संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

संपूर्ण पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब तपासल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषमुक्त केले. तब्बल १३ वर्षे चाललेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*