Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*सिलिगुडी येथे BSF शपथग्रहण सोहळ्यात रोशनी मुळीकची घवघवीत कामगिरी*

बेळगांव:सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) शपथग्रहण समारंभात बेळगावच्या लेकीने कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. काल दिनांक 31 जानेवारी रोजी सिलिगुडी येथे पार पडलेल्या भव्य शपथग्रहण समारंभात कु. रोशनी वसंत मुळीक हिने तब्बल 400 युवक-युवतींच्या तुकडीचे परेड कमांडर म्हणून नेतृत्व करत विशेष मान मिळविला.

मुळची खानापूर तालुक्यातील ओलमनी येथील रहिवासी असलेली रोशनी सध्या शाहूनगर, कंग्राळी बी.के. येथे वास्तव्यास आहे. परेडदरम्यान दाखवलेल्या शिस्तबद्ध नेतृत्वगुणांमुळे आणि उत्कृष्ट ड्रिल कौशल्यामुळे रोशनीला या समारंभात ‘बेस्ट परेड कमांडर’ तसेच ‘बेस्ट ड्रिल’ हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
400 प्रशिक्षणार्थींमध्ये आपल्या नेतृत्वाने रोशनीने नारी शक्तीचा प्रभावी आवाज घुमवत उपस्थितांची मने जिंकली. रोशनी ही शाहूनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैष्णवी वसंत मुळीक यांची कन्या असून, तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण खानापूर तालुका व बेळगाव जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रोशनीचे यश हे ग्रामीण भागातील तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत असून, देशसेवेच्या वाटेवर चालणाऱ्या नव्या पिढीसाठी ती आदर्श ठरत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*