Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*चौथ्या खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे वर्चस्व*

बेळगाव :
चौथ्या खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो अकॅडमी, बेळगावच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. दि. 13 व 14 डिसेंबर रोजी एस.पी.एस. पब्लिक स्कूल, होसदुर्ग येथे पार पडलेल्या या स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये फाईट, तुमसे आणि स्पीड पंच अशा प्रकारांचा समावेश होता. स्पर्धा ६, ८, १०, १२, १४, १८ वर्षे व १८ वर्षांवरील वयोगट तसेच विविध वजन गटात घेण्यात आल्या.
सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत
👉 १६ सुवर्ण पदके,
👉 ७ रौप्य पदके
👉 ६ कांस्य पदके
अशी दमदार कामगिरी केली. या यशाच्या जोरावर अकॅडमीने बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंमध्ये
सार्थ सोलापूरकर, अवनीश खूबसद, सार्थक निर्मले, अद्वय घनताडे, मानस आवटे, राजवीर मगदूम, अहिल पठाण, रौनक धनवडे, श्लोक लिगाडे, अभिषेक उपाळे, अर्जुन वाळवे, नक्षत्र मगदूम, अर्णव बोरगावे, समर्थ पाटील, महावीर गांची, समर्थ निर्मले, तरुणकुमार गांची
तसेच मुलींच्या गटात
दिया तीपे, रुही बोधले, स्नेहल मगदूम, शुभ्रा अक्की, निधी साठे, सानवी कदम, लावण्या सावंत, तनया वाळवे, तन्वी धनानंद, ब्रिंदा खूबसद, अवनी व्हदडी, समयरा पठाण
यांनी सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या यशस्वी वाटचालीमागे मुख्य तायक्वांदो प्रशिक्षक श्री. बबन निर्मले तसेच सह-प्रशिक्षक गणेश हुलकंती, प्रथमेश भोसले, देवराज मल्हाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहनही खेळाडूंना लाभत असल्याचे नमूद करण्यात आले. यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*