LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Entertainment News

*संवादिनी वादक पं. सुधांशु कुलकर्णीना कै.पं.अप्पासाहेब जळगावकर पुरस्कार*

ज्येष्ठ हार्मोनियमवादक पं. आप्पासाहेब जळगांवकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निगडी येथे संवादिनी कला मंच आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वरसामन्वय” या अनोख्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बेळगावचे प्रख्यात संवादिनी वादक डॉ. सुधांशु कुलकर्णी यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आणि हार्मोनियमच्या परंपरेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कै. पं. अप्पासाहेब जळगावकर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.हा पुरस्कार प्रख्यात व्हायोलिनवादक पं. अतुल कुमार उपाध्ये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संवादिनी कला मंचचे अध्यक्ष श्री. संतोष घंटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा कार्यक्रम रसिकांना हार्मोनियमच्या समृद्ध परंपरेचा आणि विविध वाद्यांच्या सुरेल संगमाचा आगळावेगळा अनुभव देणारा ठरला.

निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात हार्मोनियमवादक डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांच्या विशेष सत्कार व पुरस्कार प्रदान समारंभाने झाली. यानंतर सुप्रसिद्ध गायिका डॉ. राधिका जोशी यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या गायनाला हार्मोनियमवर श्री. सुरेश फडतरे तर तबल्यावर पार्थ ताराबादकर यांनी समर्थ साथसंगत दिली.

त्यानंतर डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांचे विशेष हार्मोनियम वादन रंगले. त्यांच्या वादनाला तबल्यावर श्री. विनायक गुरव यांनी प्रभावी साथ दिली.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. राधिका जोशी, राकेश श्रीवास्तव, डॉ. अवंतिका सिन्हा, संतोष घंटे, डॉ. सुधांशु कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

'या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली हे माझे भाग्य समजतो. मी अजूनही विद्यार्थीच आहे आणि साधक म्हणून हा प्रवास असाच पुढे होत राहील" अशा शब्दात पं. सुधांशु कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*