LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*फुटबॉल स्पर्धेत संत मीरा जी जी चिटणीस शाळेला विजेतेपद*

बेळगाव तारीख 25. टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर सरकारी शाळा भाग्यनगर आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर प्राथमिक मुलाच्या गटात  जी जी चिटणीस व मुलींच्या गटात संत मीरा शाळेने विजेतेपद पटकाविले.

 मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात जी जी चिटणीस शाळेने एम व्ही हेरवाडकर शाळेचा पेनाल्टी शूटआउटवर 4-3 असा पराभव केला विजयी संघाच्या साई अनगोळकर, यशराज पी,पियुष,तेजस गावडे यांनी प्रत्येकी 1 गोल केले.

 दुसऱ्या उपात्य सामन्यात केएलएस शाळेने संत मीरा शाळेचा 1-0असा पराभव केला, विजयी संघाच्या विहान पाटीलने एकमेव गोल केला.

 अंतिम सामन्यात जी जी चिटणीस शाळेने पेनाल्टी शूटआउटवर केएलएस शाळेचा 3-2 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या पियुष पत्तार, सोहम सूर्यवंशी, तेजस गावडे, तर पराभूत संघातर्फे आरमान मुल्ला, विश्वनाथ जे यांनी प्रत्येकी 1 गोल केले.

 मुलींच्या गटातील पहिल्या सामन्यात जी जी चिटणीस शाळेने विमल येळ्ळुरकर शाळेचा 3-0असा पराभव केला, दुसऱ्या सामन्यात भातकाडे स्कूलने  हेरवाडकर शाळेचा 2-0असा पराभव केला, विजयी संघाच्या निकिता प्रजापत,आस्था परीट प्रत्येकी 1 गोल केला पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने चिटणीस शाळेचा 1-0 असा पराभव केला,विजयी संघाच्या खुषी हिरेमठने एकमेव गोल केला, दुसऱ्या उपात्य सामन्यात भातकांडे स्कूलने डीपी शाळेचा 3-1  असा पराभव केला विजयी संघाच्या वेरीनिका वाळवेकर, अपर्णा अजबगोळ,आस्था परीट यांनी प्रत्येकी 1 गोल केला,तर अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने भातकाडे शाळेचा 2-0असा पराभव करीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या खुषी हिरेमठ  रितीका मोकाशी यांनी प्रत्येकी 1 गोल केला स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला  प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा सचिव एम आर आमोशी,संतोष दळवी, जयसिंग धनाजी, बापू देसाई, उमेश मजुकर, कौशिक पाटील,हर्ष रेडेकर, शिवकुमार सुतार, या मान्यवरांचे हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*