Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कोगनोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप.*

कोगनोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप.

कोगनोळी प्रतिनिधी...
कोगनोळी ता निपाणी येथील श्री वीरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल कोगनोळीच्या सात विद्यार्थ्यांची 5000 रुपयांच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. कोगनोळी हायस्कूल मधील ज्या पाल्यांचे पालक अवजड वाहनांचे चालक आहेत अशा विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली. नुकताच हा शिष्यवृत्ती समारंभ हायस्कूलमध्ये पार पडला.

दिल्ली येथील आयडीएफसी फर्स्ट बँकच्या प्रतिनिधी श्रीमती नेहा अग्रवाल या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. नॅशनल हायवेज इन्फ्रा ट्रस्ट कोगनोळीचे एम रविंद्रन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक आर आर कुऱ्हाडे यांनी केले. देशाची अर्थव्यवस्था गतिमान करणाऱ्या वाहन चालकांच्या पाल्यांचा शैक्षणिक विकास सुलभ व्हावा या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट यांच्या वतीने ही स्कॉलरशिप दिल्लीहून मंजूर करण्यात आली असे प्रतिपादन हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एन अलगुरे यांनी केले. ग्रामीण भागामध्ये आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील विद्यार्थ्यांची गुणवत्ता अत्यंत चांगली असून त्यांना योग्य आर्थिक पाठबळ मिळाले तर ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात मागे पडणार नाहीत.

हाच उद्देश ठेवून नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टने कोगनोळी येथील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांची पाच हजार रुपयांच्या स्कॉलरशिप साठी निवड केली असे अमोल आवटे यांनी सांगितले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक ए.पी कुलकर्णी,आर आर नवाळे ,आर ए डोंगरे, वर्षा नवाळे, नॅशनल हायवेचा स्टाफ, पालक विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन ए . व्हि.आवटे यांनी केले आर आर कुराडे यांनी आभार व्यक्त केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*