LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

स्कायवर्ड अकॅडमीतील विद्यार्थिनीची बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टवर निवड

बेळगावातील गोंधळी गल्ली परिसरातील स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड हँडलिंग विभागात निवड झालेल्या विद्यार्थिनी नागवेणी पाशेट्टी हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच अकॅडमीचे प्रमुख विनोद बामणे, सरस्वती इन्फोटेकच्या ज्योती बामणे, अश्विनी मैत्री, राघवेंद्र मैत्री आणि वेद मैत्री यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान बोलताना मल्लेश चौगुले यांनी स्कायवर्ड अकॅडमीच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, विनोद बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण व मराठी, कन्नड माध्यमातील विद्यार्थी येथे येऊन व्यावसायिक प्रशिक्षण घेतात आणि त्यानंतर विविध क्षेत्रांत यशस्वीरीत्या कार्यरत होतात.
ते पुढे म्हणाले की, जसे नर्सिंग शिक्षणानंतर रोजगाराची हमी असते, त्याचप्रमाणे स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
अकॅडमीचे प्रमुख विनोद बामणे यांनीही विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना एव्हिएशन क्षेत्रातील वाढत्या संधींबाबत माहिती दिली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचा विश्वास पाहायला मिळाला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*